‘भीष्मोत्सव’ : पाच उत्कट कथांचा उत्तम आविष्कार
भीष्म साहनी यांच्या कथेत एवढं नाट्यं असतं की, त्या मंचित करणं तसं सोपं आहे. पण त्यातील आशयापलिकडे लपलेला आशय समजावा लागतो, तरच त्यांच्या कथांना न्याय देता येतो. ही दुर्मीळ समज ‘भीष्मोत्सव’च्या दिग्दर्शिका श्रीमती सीमा पाहवा यांच्याकडे आहे. यात ‘ऊब’, ‘सीर का सदका’, ‘ढोलक’, ‘यादे’ आणि ‘समाधी भार्इ रामसिंग’ या पाच कथा आहेत. ‘भीष्मोत्सव’मध्ये सीमा पाहवा, मनोज पाहवा, रत्ना पाठक व नसरुद्दीन शहा यांसारखे ज्येष्ठ कलावंत आ.......